पुणे: घरफोडी प्रकरणात एकाला पोलीस कोठडी

पुणे – घरफोडी करून 1 लाख 31 हजार 450 रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

विकास सुनील घोडके (22, रा. गणेशनगर, वडगावशेरी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गणेश बळभीम पोकळे (35, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली. ही घटना 29 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.

29 डिसेंबर रोजी पोकळे हे कोरेगाव पार्क येथे गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील घराला कुलूप लावून बाजारात गेले. त्यावेळी घोडके घराचे कुलूप तोडून घरातील 1 लाख 31 हजार 450 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी घोडके याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याचे आणखी साथीदार आहे का?, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी, घोडके गुन्ह्याच्या संदर्भाने पूर्वीचे रेकॉर्ड तपासण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)