पुणे: गुणपत्रिका वाटपानंतर विद्यार्थ्यांकडून एकच जल्लोष

प्रभात वृत्तसेवा

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांकडून मंगळवारी मूळ गुणपत्रिका देण्यात आल्या. मूळ गुणपत्रिका हातात घेताच, विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. बहुतांश महाविद्यालयातर्फे गुणवंतांचा सत्कार करण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

-Ads-

बीएमसीसीमध्ये गुणवतांचा सत्कार करण्यात आला. दृष्टिहिन विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आलेला संदीप पवार म्हणाला, दृष्टिहिन असलो, तरी देशाच्या विकासात मला हातभार लावायचा आहे. माझ्या अभ्यासात कॉलेजमधील शिक्षकांबरोबरच संग्राम या माझ्या मित्राचीही मला खूप मदत झाली. दिव्यांग गटातील सिद्धार्थ परळे म्हणाला, मी रायटरची मदत न घेता, स्वत: सर्व पेपर सोडवले. त्यामुळे मला मिळालेल्या गुणांवर मी खूप खूष आहे. बीएमसीसीतूनच मला बी.कॉम व्हायचे आहे, असे त्याने सांगितले.
दृष्टिहिन विद्यार्थ्यांचे यश लक्षवेधी आहे. फर्ग्युसनमधील शिक्षक आणि वर्गमित्रांच्या मदतीमुळेच मला हे यश मिळाले. यापुढे इथूनच बीए करताना पुढे युपीएससी देऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे, नंजा पवरा याने सांगितले. फर्ग्युसनमधील शिक्षक व वर्गमित्रांच्या मदतीबरोबरच ऑडिओ बुक्‍स व ब्रेलमधील पुस्तके वाचून अभ्यास केला. यापुढे मला अर्थशास्त्रात बीए करून बॅंकेत अधिकारी व्हायचे आहे, असे पूजा हिने सांगितले.

सई पुराणिक म्हणाली, डिजिटल मॅग्निफायरचा (भिंग) वापर करून मी पुस्तके वाचली. प्रत्येक पुस्तक वाचून माझ्या शैलीत ते पुन्हा लिहून अभ्यास केला. बारावीच्या वर्षातही मी जर्मन भाषेचा अभ्यास सुरूच ठेवला होता. आता मी झेवियर्स कॉलेजमधून सोशिओलॉजीमध्ये बीए करणार असल्याचे सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)