पुणे – गारेगार “शिवशाही’त आता ज्येष्ठांनाही सवलत

– वर्धापन दिनानिमित्त एसटी महामंडळाची अनोखी भेट
– राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

पुणे – स्वस्तात गारेगार प्रवासाचा अनुभव देणाऱ्या “शिवशाही’ बसने अल्पावधीतच प्रवाशांच्या मनात स्थान मिळवले आहेत. आता या बसेसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. 1 जून रोजी राज्य परिवहनचा (एसटी) 70 व्या वर्धापनदिन असून या निमित्ताने बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

 

राज्यभरात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यातही ज्येष्ठ नागरिकांकडून सुखाने प्रवास व्हावा, यासाठी “लालपरी’ची निवड केली जात होती. यामुळे यापुर्वी एस.टी.च्या साधी, रातराणी तसेच निमआराम गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाते. परंतु नव्याने सुरू झालेल्या शिवशाही गाडीत ज्येष्ठांना ही सवलत देण्यात येत नव्हती. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये काही प्रमाणात याबाबत नाराजी होती. ज्येष्ठांनाही शिवशाहीसारख्या बसेसमधून कमी दरात गारेगार प्रवास करता यावा यासाठी सवलत देण्याची मागणी, ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करुन अखेर परिवहन मंत्री रावते यांनी 1 जूनपासून शिवशाही बसमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या वातानुकूलीत शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसमध्ये एकुण तिकीट मुल्याच्या 45 टक्के, तर वातानुकूलीत शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसमध्ये (एसी स्लीपर) एकुण तिकीट मुल्याच्या 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. 1 जून रोजी एसटीचा वर्धापनदिन असून या दिवसापासून ही सवलत राज्यभर लागू करण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले आहे. या सवलतीच्या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना वातानुकूलित शिवशाही बसने सवलतीच्या दरात आरामदायी प्रवास करता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)