पुणे गारठले!

राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद


कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

पुणे – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरूवात केली असून मराठवाड्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही थंडी वाढली आहे. पुणे शहरातही चांगलाच गारठा जाणवत असून शुक्रवारी राज्यातील सर्वात नीचांकी तापमान पुणे आणि नाशिकमध्ये 11.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

राज्यात कोरडे हवामान असल्याने थंडी वाढली आहे. पुढील दोन दिवस ही थंडी कायम राहणार आहे. येत्या रविवारी आणि सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागातील किमान तापमान किंचित वाढण्याची शक्‍यता आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार असून थंडी काही प्रमाणात वाढणार आहे. पुणे शहरात ही गेले दोन दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. शुक्रवारीसुद्धा राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

-Ads-

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गाजा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्‍यता आहे. तसेच केरळच्या उत्तर भागात समुद्रसपाटीपासून सुमारे 3.1 किलोमीटर उंचीवर असलेल्या चक्राकार स्थितीचा काहीसा परिणाम होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्‍यता आहे. सध्या राज्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली असून किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)