पुणे – गणेशोत्सवात पीएमपीच्या जादा बसेस

File Photo

– पहिले तीन दिवस 170 आणि शेवटचे पाच दिवस 600 बसेसमधून सेवा

पुणे – गणेशोत्सवानिमित्त शहरात होणारी गर्दी लक्षात घेता पीएमपीकडून दरवर्षी जादा बसेसचे नियोजन करण्यात येते. यावर्षीही प्रशासनाने रात्री प्रवाशांच्या सोयीसाठी शुक्रवारपासून (दि.14) दोन टप्प्यात जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये पहिले तीन दिवस 170 बस आणि शेवटचे पाच दिवस 600 बसेसमधून ही सेवा देण्यात येणार आहे.

महापालिका, स्वारगेट, न.ता. वाडी, सिंहगड रस्ता, हडपसर, कात्रज, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, आळंदी रस्ता, नगर रस्ता, विश्रांतवाडी, औंध रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता आदी सर्व प्रमुख मार्गांवर शुक्रवारपासून रात्री जादा बस धावणार आहेत. रात्री दहानंतर गर्दी संपेपर्यंत बससेवा सुरू राहणार आहे. त्यासाठी सर्व स्थानकावर स्टार्टर व स्थानक प्रमुख यांच्या तीनही पाळ्यांमध्ये नेमणुका करण्यात आल्या आहेत. येत्या शुक्रवारी (दि.14), शनिवार व रविवारी 170 आणि यानंतर सोमवारपासून (दि.17) 600 बस रात्रीच्या सेवेसाठी उपलब्ध असतील. नेहमीच्या प्रवासभाड्यापेक्षा सव्वापट जादा शुल्क घेऊन रात्रीची बससेवा पुरविली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, 23 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्यामुळे शहरातील मुख्य रस्ते बंद राहत असल्याने वाहतुकीची अडचण निर्माण होऊन वाहतूक पोलिसांकडून रस्ते बंद ठेवले जातात. त्याकरीता स्वतंत्र्य नियोजन करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
————————–

– विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर वॉच
गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीकडून जादा बसेसमार्फत अतिरीक्त सेवा पुरवली जाते. रात्रीच्या वेळी सेवा देण्यात येत असल्याने याचा काही जणांकडून गैरफायदा घेतला जातो. यामुळे तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांवर यावेळी विशेष लक्ष देण्यात येणार असून यासाठी पथके असणार आहेत. या पथकांकडून रात्रीच्या वेळी बसेसची तपासणी केली जाणार असून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
———————-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)