पुणे: खूनप्रकरणी एकाला पोलीस कोठडी

पुणे – गळा कापून आणि डोक्‍यात दगड घालून खून केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अजिंक्‍य विजय कांबळे (21, रा. येरवडा) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. निखील श्रीकांत कडाळे (22, रा. येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत राजेश सुरेश जगताप (38) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)