पुणे – जादा भाडे घेणे, विनापरमिट गाडी चालवणाऱ्या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जोरदार कारवाई सुरूच आहे. बुधवारी (दि.16) अखेर आरटीओने 596 गाड्यांची तपासणी केली. यात 155 गाड्यांवर कारवाई करुन जवळपास 16 लाख 21 हजार एवढा दंड वसूल केला आहे.

राज्य शासनाने खासगी बसचे भाडे निश्‍चित केले आहे. खासगी गाड्यांना एसटी बसच्या भाडेदराच्या दीडपट भाडे आकारता येणार आहे. मात्र, काही गाड्याचालकांकडून जादा दर आकारला जात असल्याच्या तक्रारी आरटीओकडे आल्या होत्या. त्यानूसार आरटीओकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. दिनांक 2 ते 16 मेदरम्यान ही कारवाई केली असून यापुढेही ती सुरू राहणार आहे. बुधवारी आरटीओने तपासणी केलेल्या गाड्यांपैकी 7 वाहने निकाली काढण्यात आली. तर 2 वाहनांवर खटला दाखल करण्यात आला आहे. यातून एकूण 3 लाख 27 हजार 847 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)