पुणे: क्रीडा साहित्यांसाठी महापालिका देणार अनुदान

पुणे – शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आता क्रीडा साहित्यांसाठी 50 हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. त्यासाठीचा निर्णय क्रीडा समितीने घेतला असून पुढील बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार असल्याचे क्रीडा समितीचे अध्यक्ष राहूल भंडारे यांनी सांगितले.

क्रीडा साहित्याला अनुदान योजनेसाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात सुमारे 60 लाख रुपयांची तरतूद असून महापालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे अनुदान दिले जाणार आहे. महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या क्रीडा धोरणात सुधारणा करण्यात येत असून यांतर्गत ही तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील उदयोन्मुख खेळांडूना प्रोत्साहन मिळावे तसेच आंतराराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी महापौर चषक क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांसह खेळाडूंना सरावासाठी तसेच क्रीडा स्पर्धांची तयारी करण्यासाठी प्रत्येकी 50 हजार हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यासाठी 2018-19च्या अंदाजत्रकात सुमारे 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे अनुदान देताना ते खेळाडूंना साहित्याच्या स्वरूपात देण्याबाबत समितीने निर्णय घेतला आहे. याशिवाय, या उपक्रमासाठी सर्व क्रीडा स्पर्धांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नसल्याचे भंडारे म्हणाले, दरम्यान, महापालिकेकडून या उपक्रमांतर्गत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे मेडल असलेल्या खेळाडूंनाही या उपक्रमाचा लाभ देण्यात येणार असल्याचे क्रीडा विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)