पुणे – कौटुंबिक न्यायालयाच्या चौथ्या, पाचव्या मजल्याचे बांधकाम सुरू

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर असलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याचे बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून वर्षभरात बांधकाम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

न्यायाधिशांसाठी कॉटर्स, वकिलांशी संबंधित विविध कार्यक्रम घेता यावे यासाठी 400 आसन क्षमता असलेला एक हॉल, ग्रंथालय अशा बाबी या मजल्यांवर असणार आहेत, अशी माहिती दी पुणे फॉमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली. सध्या या इमारतीमध्ये 8 कोर्ट असून त्यात 5 कौटुंबिक न्यायालये आणि 3 सिनीअर डिव्हीजनचा समावेश आहे. लहान मुलांना भेटण्यासाठी मुलांचे संकुल, पक्षकार, कर्मचारी आणि वकील यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था, प्रतीक्षालय, दूरदर्शन संच, सुसज्ज ग्रंथालय, मानसोपचारतज्ज्ञ, बाल मानसोपचारतज्ज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. न्यायालयीन कक्षाची रचना देखील विशिष्ट पद्धतीने केली आहे. ज्यामध्ये शारीरिकदृष्ट्या विकलांग, पक्षकारांसाठी रॅम्पची व्यवस्था केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निधीची कमरता असल्याने सुरुवातीला केवळ तीन मजल्यांची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता चौथ्या व पाचव्या मजल्याचे काम सुरू झाल्याने येथील वकील, पक्षकार व कर्मचारी यांची सोय होणार आहे. दरम्यान, येथील पार्किंगचा प्रश्‍न अद्याप मार्गी लागलेला नाही.

वेळेत काम पूर्ण होणार का?
कौटुंबिक न्यायालयाच्या तीन मजल्याच्या इमारतीचे बांधकामात अनेक अडथळे आले होते. 2009 साली भूमिपूज झालेल्या कोर्टाचे बांधकाम पूर्ण होण्यास तब्बल नऊ वर्षांचा कालावधी लागला होता. ऑगस्ट-2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या उपस्थितीत कौटुंबिक न्यायालयाचे उद्‌घाटन झाले होते. अशीच स्थिती नव्याने बांधण्यात येणाऱ्या दोन मजल्यांची होऊ नये, अशी चर्चा सध्या न्यायालयीन घटकांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)