पुणे : कोरेगाव पार्कमध्ये किरकोळ वादातून भिक्षुकाचा खून

पुणे : डोक्‍यात जड वस्तू घालून एका भिक्षुकाचा खून करण्यात आल्याची घटना कोरेगाव पार्क येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. बार्टी केंद्राजवळ हा खून झाला. शनिवारी रात्री दुसऱ्या एका भिक्षुकाने पूर्वी झालेल्या वादातून खून हा खून केला आहे.

सोनु रामतेज कुशावह (28, रा.साधु वासवानी ब्रीजखाली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा खून केल्याप्रकरणी शिवा नावाच्या भिक्षुकावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भात सविस्तर असे, की साधू वासवानी मिशनतर्फे दररोज सकाळी 9 वाजता बार्टी कार्यालयाजवळ अन्नदानाचे वाटप करण्यात येते. यामुळे येथे आजूबाजूचे गरीब व भिक्षूक नेहमी येत असतात. येथे मागील तीन ते चार महिन्यांपासून मंदिराच्या कठड्यावर सोनू हा मुक्कामी रहात होता. तो भिक मागून आपली उपजीविका करत होता. येथे आरोपी शिवा हा भिक्षूकही अन्न घेण्यासाठी येत असे. मात्र तो इतर गरिबांना दमदाटी करत त्रास देत होता. यावरुन सोनूने त्याला 15 दिवसांपूर्वी “तू गरिबांना का त्रास देतोस?’ असा जाब विचारला होता. यावेळी शिवाने त्याला “तुला बघून घेतो’ अशी धमकी दिली होती. यावेळी त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली होती.

दरम्यान, शनिवारी रात्री सोनू मंदिराच्या कठड्यावर झोपला असता, शिवाने त्याच्या डोक्‍यावर जड वस्तूने वार करुन खून केला. सकाळी तो मृतावस्थेत नागरिकांना आढळला. याप्रकरणी महिला सहायक पोलीस निरीक्षक एम.जी.नाईक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)