पुणे कॅन्टोन्मेंट बॅंकेची फुरसुंगी येथे शाखा

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बॅंकेच्या फुरसुंगी, भेकराईनगर या नवीन शाखेचे उद्‌घाटन महाराष्ट्र अर्बन बॅंक्‍स फेडरेशन मुंबई चे अध्यक्ष विद्याधर ऊर्फ बाळासाहेब अनास्कर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे अध्यक्ष कैलासराव (मामा) सखाराम कोद्रे हे होते.

कोद्रे यांनी यावेळी सांगितले की, बॅंक केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित न करता गरजू लोकांना मदत करण्यावर भर देते. त्यामुळे बॅंकेचे ग्राहकांशी असलेले नाते दृढ झाले आहे. बॅंकेच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून बॅंकेने फुरसुंगी, भेकराईनगर भागातील ग्राहकांकरीता नवी शाखा सुरू केली असून या भागातील ग्राहकांना बॅंकेच्या आधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यावेळी अनास्कर यांच्या हस्ते लॉकर सुविधेचे आणि एटीएम कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. अनास्कर म्हणाले की, कोद्रे यांया नेतृत्वाखाली बॅंकेचा चांगला विस्तार होत आहे. यामुळे या भागातील लोकांच्या बॅंकिंग गरजा पुर्ण होण्यास मदत होणार आहे. ते म्हणाले की, एक विश्‍वस्त तसेच सामाजीक बांधीलकी म्हणून म्हणून कोद्रे हे अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

यावेळी माजी आमदार रामभाऊ मोझे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नाना हरपळे, शंभो महादेव देवस्थान ट्रस्टचे दादासाहेब कामठे, आर्किटेक्‍ट श्रुती साठे, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेवक योगेश ससाणे, मारुतीआबा तुपे, उज्ज्वला जंगले, भारतीताई शेवाळे, संजय हरपळे, राजेंद्र भाडळे, सचिन हरपळे, योगेश सातव, संजय मोडक, जयसिंग गोंधळे, माजी अध्यक्ष बापुसाहेब गानला, मोहन सोळंकी, शांताराम चौधरी, बॅकेचे उपध्यक्ष नंदकिशोर बीडकर इ. उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)