पुणे : कुलगुरूंच्या अहवालात ‘व्हीजन’ हवे!

अर्थसंकल्पास मंजुरी 


अधिसभा सदस्यांनी व्यक्‍त केली अपेक्षा

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अधिसभेत गेल्या वर्षभराच्या कालावधीत विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय, आर्थिक व वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा अहवाल सादर केला. त्यातून विविध कार्या प्रकाशझोतात येतात. मात्र यापुढच्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाचे काय शैक्षणिक “व्हीजन’ राहील, त्याचा उल्लेख कुलगुरूंच्या भाषणात असावा, अशी अपेक्षा काही अधिसभा सदस्यांनी व्यक्‍त केली.

कुलगुरू डॉ. करमळकर यांनी अधिसभा सुरू होताच लिखित स्वरुपातील अहवाल सादर केला. मागील अधिसभेनंतरच्या काळातील विद्यापीठाच्या वैशिष्ट्यपूर्ण घटना व बाबींचा अहवाल अधिसभेत सादर करण्याची प्रथा आहे. त्यानुसार ठळक घडामोडींचा संक्षिप्त आढावा कुलगुरूंनीही अधिसभेत मांडला. सदस्यांना ही माहिती होणे अपेक्षित आहे. मात्र कुलगुरूंचे भाषण हे केवळ कार्याचा आढावा असावा. त्याचबरोबर व्हीजन असल्यास, ते शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शक ठरेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठाच्या कोणत्या विभागाने काय उपक्रम राबविले, विद्यापीठाने घेतलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा आणि यशस्वीपणे झालेल्या वाटचालीचा आढावा अहवालात असतो. ही प्रथा योग्यच आहे. पण कुलगुरूंचे भाषण हे सर्व शैक्षणिक संस्थांना नवा आयाम ठरेल, या दृष्टीने शैक्षणिक व्हीजन अहवालात असणे अभिप्रेत आहे, असे एका सदस्याने सांगितले. विद्यापीठाने येत्या दोन-पाच वर्षात काय नवे योजना, उपक्रम, धोरणात्मक निर्णय काय असतील? त्यापुढील दिशा काय असेल? शैक्षणिक रोडमॅप काय असतील, त्याचा उल्लेख प्रकर्षाने होणे आवश्‍यक आहे. त्यातून अन्य संस्था बोध घेऊन शैक्षणिक संस्थांत बदल आणू शकतात. त्यामुळे पुढच्या अधिसभेच्या भाषणात तरी विद्यापीठाच्या व्हीजनवर भर देतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.

‘बजेट अंमलबजावणी समिती’ नेमावी
पुणे विद्यापीठाचा 649 कोटींच्या अर्थसंकल्पास अधिसभेने मंजुरी दिली. मात्र या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार त्याची अंमलबावणी होणे आवश्‍यक आहे. अन्यथा अर्थसंकल्पाचे वित्तीय नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तरतुदीनुसार कार्यवाही होण्यासाठी विद्यापीठाने “बजेट अंमलबजावणी समिती’ नेमावी. त्यातून योग्य पद्धतीने नियोजन करणे शक्‍य होणार आहे, अशी सूचना काही अधिसभा सदस्यांनी सभागृहात मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)