पुणे: काशी यात्रेच्या नावावर 23 जणांना 5 लाखांचा गंडा

पुणे – काशी यात्रेस घेवून जाण्याचे आमिष दाखवून 23 नागरिकांकडून पैसे घेतले. मात्र, त्यांना यात्रेस घेवून न जाता 5 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये आशुतोष नावाच्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष गुजराथी (वय 39, रा. पारसनीस कॉलनी, मार्केटयार्ड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मार्च 2018 मध्ये वर्तमानपत्रामध्ये काशी तीर्थयात्रेची जाहिरात प्रसिध्द केली होती. सदर जाहिरात वाचून फिर्यादी गुजराथी यांच्या आईने त्यामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आरोपींनी अत्यंत माफक भावात काशी त्रिस्थळी यात्रा घडवून आणू असे बोलून त्यांचा विश्‍वास संपादीत केला. त्यानंतर प्रवासाचे तिकीट, हॉटेल आणि बस बुकिंगसाठी पैसे जमा करण्यास सांगितले. फिर्यादींची आई आणि इतर 22 जणांनी 5 लाख 17 हजार 100 रुपये जमा केले. मात्र, ठरलेल्या दिवशी कोणालाही यात्रेला नेले नाही. तसेच, घेतलेले पैसेही परत दिले नाही असे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार आर. एन राऊत पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)