पुणे: कारचालकावर चाकूने वार करून लुटले

पुणे – रस्त्याच्या कडेला कार उभी करून थांबलेल्या कारचालकावर दोघांनी चाकूने वार करून मोबाईल आणि रोख रक्कम असा 9 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. कात्रज चौक ते जेएसपीएम कॅम्पसदरम्याच्या रस्त्यावर बुधवारी पहाटे हा प्रकार घडला.

नारायण होणे (38, रा. सहयोगनगर, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोघांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होणे यांनी बुधवारी (दि.27 जून) पहाटे जेएसपीएम कॉलेजसमोरील रोडवर कार उभी केली होती. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारच्या डाव्या बाजुस असलेला समोरचा दरवाजा बळजबरीने उघडला. तसेच कारमध्ये ठेवलेला मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 9 हजार 100 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. फिर्यादींनी चोरट्यांना प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना मारहाण केली, तसेच चाकूने वार करून जखमी केले. यानंतर तेथून पळ काढला. हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक बी. एच. अहिवळे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पुर्वीही अशाच प्रकारे लुटले
कारचालकाला लुटणारे दोघे जण बिबवेवाडी येथील पर्पल प्लाझा येथे थांबल्याची माहिती सहायक फौजदार प्रदिप गुरव आणि पोलीस हवालदार विनोद भंडलकर यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजता दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीदरम्यान त्यांच्या दुचाकीत चाकु आढळून आला. त्यांनी दोन महिन्यापुर्वीही अशाच प्रकारे कात्रज चौकात कारचालकास लुटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)