पुणे : काय सांगता…आता रेशनकार्डवर मिळणार मीठ!

1 जुलैपासून अंमलबजावणी : ऍनेमिया रुग्णांचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न
प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यात अंमलबजावणी

पुणे – देश आणि राज्यात ऍनेमिया रुग्णांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. पुरेशा प्रमाणात लोहयुक्त गोळ्या व इतर पोषकद्रव्य दिल्यास ऍनेमिया नियंत्रणात आणता येते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लोह व आयोडीनयुक्त मीठ वितरीत करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार शासनाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना मीठ वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनकार्डवर रेशनकार्डधारकांना 14 रुपये प्रति किलो या दराने मीठ मिळणार आहे. येत्या 1 जुलैपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2015-16 च्या चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यातील 53.8 टक्के मुलांमध्ये (वय 6 महिने ते 5 वर्षे) आणि 15 ते 49 वर्षे वयाच्या महिलांमध्ये 48 टक्के इतक्‍या मोठ्या प्रमाणात ऍनिमिया असल्याचे दिसून आले आहे. संशोधनाने हे सिध्द केले आहे की, पुरेश्‍या प्रमाणात लोहयुक्त गोळ्या व इतर पोषकद्रव्य दिल्यास ऍनिमिया नियंत्रणात आणता येते. सध्यस्थितीत ऍनिमिया नियंत्रणाचा प्रयत्न होत आहे. सदर उपाययोजनेला पुरक ठरतील अशा उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लोह व आयोडीन युक्त मीठ वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लोह व आयोडीनयुक्त मीठ टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रायोगिक तत्वावर पुणे व नागपूर शहरामधील रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरीत केले जाणार आहे. हे मीठ रेशनकार्डधारकांना 14 रुपये प्रति किलो या दराने वितरीत करण्यात येणार आहे.

या मिठाची वाहतूक शासकीय गोदामार्फत टाटा ट्रस्टमार्फत करण्यात येईल. सदर मीठ साठविण्यासाठी गोदाम उपलब्ध करून देणे, मीठ शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
टाटा ट्रस्ट हे मीठ शासनास 11 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना 12 रुपये 50 पैसे प्रति किलो या दराने उपलब्ध होणार आहे. तर रेशनकार्डधारकांना 14 रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे. येत्या 1 जुलैपासून रेशनकार्डधारकांना मीठ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)