पुणे – कात्रज चौकात विनाचालक बस धावली!

कात्रज – मंगळवारी कात्रज चौकातील बस थांब्यावर लावलेली बस विना चालक रस्त्यावर धावली. चालक नसताना बस धावल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. या प्रकरणात दोषी असलेल्या चालकाला प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे.

कात्रज चौकातील बस थांब्यावरील बस उतारामुळे पुढे जाऊ लागली. त्यावेळी गाडीमध्ये चालक नसल्याने ही बस पुढे जाऊन एका चारचाकीला जाऊन धडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पीएमपी प्रशासनाने बसचालक दिगंबर खोत याला तत्काळ निलंबित केले आहे. त्याने शिवाजीनगर वरून एक फेरी पूर्ण करून कात्रज स्थानकात बस आणली होती. त्यानंतर पुन्हा शिवाजीनगरकडे जायचे असल्याने त्यांनी बस थांब्यावरच गाडी सुरू ठेवली, व दूपारी साडेबाराला जायचे असल्याने आणि जेवणाची वेळ झाल्याने ते जेवण करण्यासाठी निघून गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बस सुरू असल्यामुळे उताराने पुढे जाऊ लागली त्याचवेळी स्वारगेटकडे जाणारा सिग्नल सुटला. स्वारगेट त्या बाह्यवळण मार्गाने नवले उड्डाणपुलाच्या दिशेने वाहने जाऊ लागली आणि त्याच दरम्यान उताराने येणारी बस (एमएच 12 सीएच 2947) चारचाकीला धडकून थांबली. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. तेवढ्यात वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन घाबरलेल्या इंडिकाचालक गणेश माळी याला गाडीतून बाजूला केले. हिंजवडीकडे निघालेले गणेश माळी सिग्नल मिळाल्यामुळे वळला आणि तितक्‍यात ही बस येऊन इंडिकाच्या पुढील बाजूस धडकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)