पुणे – कर्मचारी भरतीने प्रत्यक्ष धावणाऱ्या पीएमपी बस वाढणार

PMPML, Pune

 

पुणे – पीएमपीच्या ताफ्यातील 2 हजार 33 पैकी दररोज सरासरी फक्त 1,300 ते 1,400 बसेस धावतात. तांत्रिक बिघाड, मनुष्यबळाची कमतरता यामुळे काही बसेस रस्त्यावर येत नव्हत्या. मात्र, आता चालक, वाहक भरती झाली असून बुधवारपासून 73 चालक कामावर रुजू झाले. तर, येत्या काही दिवसांत 200 वाहक रुजू होणार आहेत. यामुळे आता रस्त्यावर धावणाऱ्या पीएमपीच्या संख्येत वाढ होणार असून प्रवाशांची गैरसोयही दूर होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमपीच्या मालकीच्या 1,440 बस असून 653 ठेकेदारांकडून चालवल्या जाणाऱ्या बसेस आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत सध्याच्या बसेसची संख्या कमी आहे. नियोजनानुसार 1,700 ते 1,800 बसेस धावण्याचे निश्‍चित केले जाते. मात्र, प्रत्यक्षात दररोज सरासरी 1,300 ते 1,400 बसेस मार्गावर धावत असतात. पर्यायाने नियोजित फेऱ्यांपैकी जवळपास 4 ते साडेचार हजार फेऱ्या रोज रद्द कराव्या लागतात. मनुष्यबळाची कमतरता, तांत्रिक बिघाड यामुळे या बसेस मार्गावर धावत नाहीत. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असून पीएमपीच्या उत्पन्नावरदेखील याचा परिणाम होतो. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीने चालक, वाहक भरती प्रक्रिया राबविली होती. गेल्या काही महिन्यांत त्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार बुधवार (दि.27) रोजी 73 वाहन चालक कामावर रुजू करण्यात आले आहेत. तर जवळपास 200 वाहक येत्या काही दिवसांत नव्याने रूजू होणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष मार्गावर धावणाऱ्या बसेसच्या संख्येतही वाढ होण्याची शक्‍यता पीएमपीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)