पुणे – कर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत भाग घ्या

पालकमंत्री गिरीश बापट : पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहण

पुणे – “आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून सरकारच्या विविध प्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. देशाच्या विकास कार्यात सहभागी होऊन, शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्या विकासामध्ये योगदान द्यावे. तसेच मतदारांनी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत भाग घेत लोकशाहीचे कर्तव्य पार पाडावे,’ असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. समारंभास महापौर मुक्‍ता टिळक, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ,यशदाचे महासंचालक आनंद लिमये, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

यावेळी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेली पदके आणि अन्य पारितोषिके पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, एनसीसी व अग्निशमन दलाने संचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी विविध शाळांतील मुला-मुलींनी आपल्या गुणदर्शनाचे प्रदर्शन करुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व प्रमुख नागरिकांची पालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय आयुक्‍त कार्यालयात ध्वजारोहण
विभागीय आयुक्‍त कार्यालयात विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपायुक्‍त संजयसिंह चव्हाण, उत्तम चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

शनिवारवाडा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उत्तम पाटील, रामदास जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, तहसिलदार विकास भालेराव, सुनील कोळी, हिरामण गवळी, अर्चना यादव, नागरी संरक्षण दलाचे उप नियंत्रक अनिल आवारे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, संजय मधाळे आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)