पुणे: औषध खरेदीला स्थायीची मंजुरी

पुणे- जीएसटी करासहीत 23 ते 51 टक्के सूट घेऊन 5 कोटी रुपयांपर्यंत औषध खरेदी करण्याला महापालिका स्थायी समितीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी याविषयी माहिती दिली.

आर्थिक दुर्बल गटासाठी आरोग्य सहाय्य योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून दैनंदिन स्वरुपात औषधे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

-Ads-

एकूण पाच निविदांपैकी सर्वात कमी दर देणारे नरेंद्र मेडिकल्स यांचेकडून आर्थिक दुर्बल गटासाठी आरोग्य सहाय्य योजनेंतर्गत दैनंदिन स्वरूपात लागणारी ब्रॅन्डेड औषधे आणि इतर साहित्याच्या छापील किंमतीवर जीएसटीसह 23 टक्के इतकी सूट घेऊन आणि जेनेरीक औषधे तसेच इतर साहित्यांच्या छापील किंमतीवर जीएसटीसह 51 टक्के इतकी सूट घेऊन 5 कोटी रुपयांपर्यंतची औषध खरेदी करण्याला स्थायीने मंजुरी दिली आहे. तसेच त्यासाठी आवश्‍यक करार करण्यालाही मंजुरी दिल्याचे मुळीक यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)