पुणे – ‘एलईडी’ दिव्यांचा घोळ कायम

प्रशासन खरेदी करणार 56 हजार एलईडी दिवे


स्थायी समितीत प्रशासनाचे आश्‍वासन

पुणे – शहरातील पथदिव्यांसाठी आणखी 50 ते 56 हजार “एलईडी’ दिव्यांची गरज आहे. ते तातडीने बसविण्यासाठी येत्या 15 दिवसांत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाकडून बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. शहरातील पददिवे “एलईडी’ विना असल्याची तक्रार सर्वपक्षीय सदस्यांकडून बैठकीत करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबत खुलासा करण्यात आला.

शहरात सुमारे 1 लाख 35 हजार पथदिवे असून त्यातील सुमारे 85 हजार पथदिव्यांना महापालिकेने टाटा प्रोजेक्‍ट्‌स प्रकल्पातून “एलईडी’ बसविले आहे. तर उर्वरीत ठिकाणी जुनेच “सीएफएल’ दिवे असून ते बदलण्यात येणार आहेत. या शिवाय नवीन समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्येही “एलईडी’ दिवे बसविण्यात येणार आहेत. मात्र, महापालिकेने टाटा कंपनीचे काम काढून घेतल्यानंतर राज्य शासनाने एनर्जी एफिशन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली असून त्यांच्याकडूनच दिवे घेण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र, या कंपनीशी अद्याप करार झालेला नसल्याने महापालिकेने शहरातील “एलईडी’ फिटींग्ज बसविण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे स्थायी समितीत यावरून चांगलाच गदारोळ झाला. यावेळी प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने “एलईडी’ दिवे घेणार असून त्यासाठी करार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. तसेच, या कामासाठी कंपनीने 9 टक्‍के सर्विस चार्जची मागणी केलेली असून ते कमी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील 15 दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेऊन “एलईडी’ दिवे लावण्याचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्‍वासन समितीत देण्यात आले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)