पुणे -‘एमआरआय’साठी कपडे बदलताना महिलेचे चित्रण

जहॉंगीर रुग्णालयातील कर्मचारी अटकेत

पुणे – शहरातील जहॉंगीर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलवर चित्रीकरण करणाऱ्या जहॉंगीर रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लंकेश लहू उत्तेकर ( 25, सध्या रा. भैरवनगर, धानोरी, मूळ रा. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पोटात वेदना होत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी तिला “एमआरआय’ तपासणी करण्यास सांगितले होते. यासाठी संबंधित महिला बंडगार्डन रस्त्यावरील जहॉंगीर रुग्णालयात शनिवारी (दि. 26) रात्री 9 च्या सुमारास दाखल झाली. दरम्यान, “तपासणीसाठी महिलेला पोशाख बदलावा लागेल,’ असे लकेश उत्तेकरने सांगितले. त्यानंतर महिलेला पोषाख बदलायच्या खोलीऐवजी दुसऱ्या एका खोलीत पाठविले. यावेळी कपडे बदलल्यानंतर महिलेला तेथे एक मोबाइल आढळला. यामुळे महिलेने तो मोबाईल पतीकडे दिला, पतीने तो तपासला असता त्यामध्ये कपडे बदलतानाचे चित्रीकरण झाल्याचे आढळले. महिलेच्या पतीने उत्तेकरला “मोबाइल कोणाचा आहे?’ याची विचारणा केली. मात्र, त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याने मोबाइल स्वत:चा असल्याची कबुली दिली. यानंतर नियंत्रण कक्षाला फोन करुन पोलिसांची मदत मागविण्यात आली. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन उत्तेकरला अटक केली. त्याच्याकडून मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)