पुणे: एफआरपी थकीत पाच कारख्यांना नोटीस

साखर कारखाने आणि थकीत रक्कम
भोगावती सहकारी साखर कारखाना, करवीर, कोल्हापूर – 51 कोटी 63 लाख 63 हजार
रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना, हातकणंगले, कोल्हापूर – 62 कोटी 32 लाख 59 हजार
वारणा सहकारी साखर कारखाना, पन्हाळा, कोल्हापूर – 15 कोटी 92 लाख 13 हजार
महाकाली सहकारी साखर कारखाना, कवठेमहाकाल, सांगली – 23 कोटी 3 लाख 42 हजार
माणगंगा सहकारी साखर कारखाना – 11 कोटी 19 लाख 15 हजार

उत्पादने आणि जंगम, स्थानावर मालमत्तांची विक्री करून वसुलीचे आदेश

पुणे – शेतकऱ्यांना उसाचे रास्त आणि किफायतशीर भाव(एफआरपी) थकीत असलेल्या पाच कारखान्यांना साखर आयुक्तालयाच्यावतीने नोटीस बजाविण्यात आली आहे.

नोटिस बजाविण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूरमधील भोगावती सहकारी साखर कारखाना, रेणूका शुगर्स संचालित रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना आणि वारणा सहकारी साखर कारखाना तसेच सांगलीतील महाकाली सहकारी साखर कारखाना आणि माणगंगा सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे.

साखर कारखान्यांनी हंगामात गाळप केलेल्या उसापोटी एफआरपी 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र, या कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिली नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत साखर आयुक्तांनी सुनावणीही घेतली होती. त्यामध्ये कारखान्यांचे प्रतिनिधी हजर होते. त्यांनी एफआरपी देण्याचे कबूल केले होते. या कारखान्यांनी एफआरपी देण्याची लेखी हमीदेखील दिली होती. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिली नसल्याने नोटिस बजाविण्यात आली आहे. या कारखान्यांकडून उत्पादित साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनांची विक्री करून एफआरपी वसूल करण्यात यावी; तसेच आवश्‍यकतेनुसार कारखान्यांच्या जंगम आणि स्थानावर मालमत्तांची विक्री करून त्याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी देण्याचे साखर आयुक्त कडू पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)