पुणे: एका दिवसात डॉक्‍टरची पदवी देण्याचे आमिष, तिघांविरोधात गुन्हा

पुणे – बनावट वेबसाईटव्दारे एका दिवसात नेचरोपॅथीक डॉक्‍टरची पदवी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक केल्याप्रकरणी तीघांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिषेक हरिदास (36, कोथरुड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी डॉ. विश्‍वजीत चव्हाण, रत्नपारखी, आगवण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तिघांनी मिळून http/nabsspalaskheda.com यावेबसाईटवर निसर्ग उपचार बहुउद्देशीय शिक्षण संस्था तयार केली. या बेवसाईटच्या माध्यमातून एका दिवसात एन.डी.डॉक्‍टर (नेचरोपॅथीक डॉक्‍टर) पदवी देण्याचे फिर्यादींना आमिष दाखवले. त्यासाठी सुरुवातीला त्यांच्याकडे 46 हजारांची मागणी केली. मात्र, यानंतर 10 हजारांची मागणी करून फिर्यादीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हरिसदास यांच्या फिर्यादीवरून कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाखडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)