पुणे-एकबोटे यांच्या मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे- भीमा कोरेगावप्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्यानुसार अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर) यांची नुकतीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एकबोटे यांनी घरचे जेवण मिळावे यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी फेटाळून लावला आहे.

एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी त्याठिकाणी दगडफेक, जाळपोळ झाली होती. याप्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 मार्च रोजी न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांना 15 मार्च रोजी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावन्यात आली. यावेळी न्यायालयाला आजारपणाबद्दल सांगितल्यानंतर न्यायालयाने आवश्‍यक ती औषधे पुरविण्याचा आदेश दिला होता. याच दरम्यान त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ होऊन न्यायायलीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने कारागृह प्रशासनाला योग्य तो औषधोपचार देण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, एकबोटे यांच्या वतीने सुरक्षा आणि घरगुती जेवण मिळावे यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये एकबोटेंनी मधुमेहाबरोबर हायपर टेंन्शनचा त्रास असल्याचे सांगितले. आरोग्याच्या या कारणामुळे प्रत्येक दोन तासाला त्यांना जेवण करण्याची आवश्‍यकता असून पोलिसांना देखील त्यांना वेळेवर जेवण देणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे त्यांना घरचे जेवण मिळावे जेणेकरून त्यांना आरोग्याचा प्रश्‍न उदभवणार नसल्याची बाब अर्जात सांगण्यात आली होती. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी वेगळ्या बराकीमध्ये ठेवण्याचीही व सोबत दोन सुरक्षा रक्षक देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)