पुणे – उमेदवारांच्या खर्च तपासणीकरिता दरसूची

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या खर्च तपासणीकरिता जिल्हा दरसूची तयार करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी कोणताही खर्च करताना कायदेशीर नियम पाळले पाहिजेत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा खर्च व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी अजित रेळेकर यांनी सांगितले.

साहित्याच्या दराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आणि वरिष्ठ कोषागार अधिकारी रमेश कुलगोड उपस्थित होते.

दरसूची निश्‍चित करताना टेंडरच्या माध्यमातून व मान्यताप्राप्त असोसिएशनमार्फत दर मागवले होते व त्यानुसार या साहित्याची दरसूची तयार केली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी खर्चाबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर मार्गदर्शन केले. काही प्रतिनिधींकडून काही साहित्य दराबाबत आक्षेप नोंदविले असता त्यांच्याकडून ज्या साहित्य दराबाबत आक्षेप आहेत त्या साहित्याच्या दराची बाजारांमध्ये खातरजमा करून त्याप्रमाणे आक्षेप नोंदवावेत, असे सांगण्यात आले. राजकीय पक्षांकडून सादर करण्यात आलेले दर व या साहित्य सूचीतील दर याची पडताळणी करून व त्याप्रमाणे खात्री करून अंतिम दरसूची तयार करण्यात येईल व ही दरसूची नामनिर्देशनाच्या वेळी उमेदवारास देण्यात येईल व त्याप्रमाणेच खर्चाची नोंद घेण्यात येईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)