पुणे : ईव्हीएमविरोधात मनसे-कॉंग्रेस एकत्र

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या-2017 च्या निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. मात्र, त्यात सत्ताधारी पक्षाने घोळ केले आहेत, असा आरोप पुन्हा एकदा करण्यात आला आहे. याविरोधात आता कॉंग्रेस आणि मनसेचे उमेदवार एकत्र आले आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसेच्या माजी नगरसेवक रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी कॉंग्रेसचे दत्ता बहिरट, मयुरी शिंदे, मनसेचे प्रशांत कनोजिया, दिपीपसिंग विश्‍वकर्मा, राहुल तुपे आदी उपस्थित होते.

महापालिका निवडणूक निकालात मतदारांची आकडेवारी जुळत नाही. याबाबत निवडणूक आयोगात तक्रारी दाखल केल्या, पण त्याचा अहवाल आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांच्याकडून अजूनही सादर करण्यात आला नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. या तक्रारीबाबत आयुक्तांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे येत्या तीन दिवसांत जर या तक्रारीचा अहवाल निवडणूक आयोगाने सादर केला नाही, तर जागरूक पुणेकर नागरिक समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा कॉंग्रेसचे दत्ता बहिरट यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)