पुणे : इंधनाच्या मालगाडी डब्याला किरकोळ आग

पुणे स्थानकावरील घटना 


तातडीच्या कारवाईने दुर्घटना टळली

पुणे – पुणे रेल्वे स्थानकात गुजरात येथून शुक्रवारी आलेल्या मालगाडीच्या एका डब्याला आग लागल्याचा किरकोळ प्रकार घडला. यावेळी रेल्वे प्रशासानाने तातडीने हालचाली केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

गुजरात येथून ही मालगाडी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमाक दोन व तीन या मधील रेल्वेलाइनवर आली होती. या मालगाडीला 50 टॅंकर जोडण्यात आले होते. या टॅंकरमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन होते. स्थानकावर ही मालगाडी आल्यानंतर अचानक रेल्वे स्थानकावर असणाऱ्या ओव्हरहेड वायरमधून शॉटसर्किट झाले आणि त्यांची एक ठिणगी टॅकरवर पडली. पण या टॅंकरचे झाकण बंद असल्यामुळे फारसे काही झाले नाही. पण, शॉटसर्किटमुळे वायर जळून खाली पडली. पण, पुढील दोन ते तीन मिनिटांमध्ये रेल्वे प्रशासनाने ही तत्काळ या घटनेवर नियंत्रण मिळविले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)