पुणे – “इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब’ची कुदळ याच महिन्यात

– स्वारगेट येथे मेट्रो, एसटी, पीएमपीसाठी टर्मिनस
– पीपीपी तत्वावर होणार भव्य संकुलाची उभारणी
– तब्बल 20 एकर जागेवर साकारणार प्रकल्प

पुणे – एसटी, पीएमपी, ऑटोरिक्षा आणि आता येणारी मेट्रो यामुळे स्वारगेटचा श्‍वास कोंडणार आहे. यावर उपाय म्हणून तेथे आता “इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब’ साकारला जाणार आहे. याचा आराखडाही तयार करण्यात आला असून याच महिन्यात या भव्य इमारतीचे भूमीपूजन केले जाणार आहे.
——————
मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण
“इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब’ आराखड्याचे सादरीकरण काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झाले. त्यानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन व महाराष्ट्र रस्ते परिवहन महामंडळाने या प्रकल्प आराखड्याच्या कामाचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले होते.
—————
वाहतूक कोंडी टळणार
स्वारगेट येथे एसटी, पीएमपीचे स्थानक असून भविष्यात स्वारगेट मेट्रो स्थानकाचीही यात भर पडणार आहे. परिणामी, भविष्यात वाहतूक करणेही कठीण जाईल, या दृष्टीने संकूल उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता.
—————–
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन?
हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन होणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास स्वारगेटचा चेहरामोहरा बदलणार आहे.
———————
20 एकर जागेची गरज
स्वारगेट येथे होणाऱ्या बहुमजली हब साठी 20 एकर जागेची आवश्‍यकता असून यातील पीएमपी, एसटी आणि मनपा यांची मिळून 17 एकर जागा ताब्यात आली आहे. तर स्वारगेट येथे असलेल्या विपश्‍यना केंद्राला भाडेतत्वावर दिलेली उर्वरीत 3 एकर जागाही येत्या काळात उपलब्ध होण्याचा दावा करण्यात आला आहे.
—————-
एकाच छताखाली सर्व सुविधा
1600 कोटींच्या या ट्रान्सपोर्ट हबमध्ये मेट्रो स्थानक, एसटी महामंडळाचे बस स्टॅंड, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बसस्थानक, टर्मिनल आदी एकत्र असणार आहेत. त्याचबरोबर भुयारी पादचारी मार्ग, शॉपिंग मॉल, थिएटर, कार्यालये व वाणिज्यिक वापरासाठीची इमारत, ओला-उबेर रिक्षा व टॅक्‍सी स्टॅंड आदींची सुविधा असणार आहे.
————-


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)