पुणे : आर्थिक शिस्त, सक्षम प्रशासनावर भर देणार

नवनियुक्त अतिरिक्त आयुक्‍त निंबाळकर यांची ग्वाही

पुणे – महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळताना आपल्याकडे असलेल्या विभागांकडील आर्थिक शिस्त, अंदाजपत्रकातील कामे वेळेत मार्गी लावणे, तसेच कामकाजात शिस्त आणण्यासाठी भर देणार, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्‍त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

उल्हासनगर महापालिका आणि पुणे महापालिकेच्या कामकाजात मोठा फरक असला, तरी यापूर्वी पुणे महापालिकेत वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सांभाळल्याने त्या कामाचा अनुभव उपयोगी पडणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.

पुणे शहरात सध्या सर्व मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्यांची अंमलबवणी योग्य पध्दतीने सुरू असली, तरी आपल्याकडे असलेल्या विभागांच्या माध्यमातून या प्रकल्पांचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, यावर आपला भर राहणार आहे. अनेकदा अंदाजपत्रकात जमा-खर्चाचे आकडे दिलेले असतात. मात्र, वस्तूस्थिती प्रत्यक्षात वेगळी असते. त्यामुळे अंदाजपत्रकातील कामे वास्तवदर्शी असावीत, यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.

त्या अनुषंगाने वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेण्यास आपण सुरूवात केली आहे. त्यानुसार, सुरूवातीचे काही दिवस कामकाजाची माहिती घेऊन तसेच सद्यस्थितीचा आढावा घेऊन शहरासाठी योग्य असलेल्या निर्णयावर आपला भर राहणार असल्याचे राजेंद्र निंबाळकर म्हणाले. यावेळी त्यांनी उल्हासनगर महापालिकेतील आपल्या कामाच्या अनुभवाची माहितीही दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)