पुणे – आरटीओत लागलेल्या आगीत कागदपत्रे जळाली

– वीजपुरवठा खंडीत झाल्याने कामकाज दिवसभर ठप्प

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पहिल्या मजल्यावर बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात काही महत्त्वाची कागदपत्रे जळाली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेत 15-20 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. आगीमुळे कार्यालयातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने दिवसभरासाठी कामकाज ठप्प झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगम पुलाजवळ आरटीओ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर उजव्या बाजूला महत्त्वाची कागदपत्रे ठेवली आहेत. येथूून सकाळी साडेसातच्या सुमारास धूर सुरू झाला. तेथे आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. तेथून दोन किमीवर असलेल्या दयाराम राजगुरू अग्निशमन केंद्रातील 3 बंब आणि 10 जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आरटीओचे मुख्य गेट बंद असल्याने जवनांनी खिडक्‍या उघडून त्यातून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग लागलेल्या हॉलमध्ये आरटीओ संबंधित कागदपत्रांची संख्या मोठी होती. त्यातील काही कागदपत्रे आगीमध्ये खाक झाली आहेत. तर, जवानांच्या तत्परतेमुळे बहुतांश कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणी कागदाचे मोठमोठे गठ्ठे असून आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही, असे स्टेशन ड्यूटी ऑफिसर विजय भिलारे यांनी सांगितले.
———————-

आगीच्या घटना घडल्याने आरटीओतील वीजपुरवठा खंडीत झाला होता. काही वेळात वीजपुरवठा सुरू होईल, असे वाटले होते. परंतु उशिरापर्यंत तो सुरू न झाल्याने अडचणी आल्या. दरम्यान, गुरूवारपासून प्रशासकीय कामकाज नियमित सुरू होईल.
– संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)