पुणे- शहरात अवैधरित्या वाहतूकीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबई – बैंगलोर महामार्गावरील वारजे माळवाडी परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 52 वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मिळून ही कारवाई करण्यात आली असून यात दोषी आढळलेली 21 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.

या तपासणी मोहीमेत एकुण 117 वाहनांची तपासणी करण्यात आली. यात 52 वाहने दोषी आढळली असून त्यांच्यावर कारवाई केली आहे. तर यातील 21 वाहने जप्त केली आहेत. यामध्ये 6 टाटा मॅजिक, 3 ऑटोरिक्षा, 12 सहासिटर गाड्यांचा समावेश आहे. सीनजी नसलेल्या गाड्या, 20 वर्षे आयुर्मान संपलेल्या, थकीत मोटार वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र मूदतीत नसणे, विना परवाना वाहतूक करणे या कारणांमुळे या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. सदर वाहने ही वारजे वाहतूक विभाग, आरटीओ कार्यालय, संगम ब्रीज पुणे याठिकाणी ठेवण्यात आली आहेत. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र केसकर, प्रमोद कुलकर्णी, संदिप भोसले, वारजे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांसह वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली. सदर मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)