पुणे – आरटीई कायदा; “विबग्योर’ च्या मुख्याध्यापकावर गुन्हा

– फी वाढीचा आराखडा सादर न केल्याने कारवाई

पुणे – नियमभंग करुन शाळेची फी वाढ करत ती न भरल्याने इयत्ता चौथीतील विद्यार्थीनीचा प्रवेश रद्द केला. तसेच तिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्यावरुन पुण्यातील मगरपट्टा भागातील एम्पायर फाउंडेशन संस्थेच्या विबग्योर शाळेवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव (58, रा. एकता हाउसिंग सोसायटी, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाळेचे मुख्याध्यापक तसेच पदसिध्द अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था (शुल्क विनीसअम अधिनियम 2011 चे कलम 16, 17 ) तसेच आरटीईनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विबग्योर शाळेच्या शुल्काबाबत पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या . याची दखल घेत तत्कालीन शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी शाळेवर कारवाई म्हणून शेैक्षणिक संस्था (शुल्क विनीयमन) अधिनियमानुसार 2 लाख रुपये दंड आकारला. शाळेने तो भरला नाही. तसेच यासंदर्भात समिती स्थापन केली होती. या समितीकडे गेल्या तीन वर्षांच्या पालक शिक्षण संघ कार्यकारी समिती सदस्यांच्या नावे, सभेचे इतिवृत्त शाळेने सादर केले नाही. त्याचबरोबर शिक्षण विभागाने मागितलेला मागील तीन वर्षाचा फीवाढीचा आरखडा सादर केला नाही. याबाबत तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांनी शाळेशी पत्रव्यवहार केला होता. नियमभंग करत फी वाढ करुन ती न भरणाऱ्या इयत्ता चौथीतील एका मुलीचा प्रवेश रद्द केला. तसेच 2018-19 साली “अन्य ठिकाणी प्रवेश घ्या’ असे पत्र दिले आहे. तसेच अन्य शाळेत प्रवेश घेण्यासाठी सदर मुलीस त्रास दिल्याची तक्रार मुलीच्या आईने शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांच्याकडे केली होती. वारंवार सूचना करुनही फरक न पडल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)