पुणे आय-टी करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा: हरबिंगर, सिमेन्स संघांचे विजय

पुणे: हरबिंगर आणि सिमेन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या आय-टी करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर होत असलेल्या लढतींमधिल पहिल्या लढतीत रोहन अनविकर आणि राजेश निंभोरे यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हरबिंगर संघाने एलटीआय संघावर 25 धावांनी मात केली. हरबिंगर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 162 धावा केल्या. यात रोहनने 48 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारसह 57 धावा केल्या. त्याला राजेश निंभोरेने नाबाद 47 धावा करून चांगली साथ दिली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना एलटीआय संघाला 6 बाद 137 धावाच करता आल्या. निंभोरेने 4 गडी बाद केले.

तर, दुसऱ्या लढतीत विशाल रैनाच्या आक्रमक शतकाच्या जोरावर सिमेन्स संघाने परसिसटंट संघावर 92 धावानी मात केली. सिमेन्स संघाने 4 बाद 219 धावांपर्यंत मजल मारली. यात रैनाने 51 चेंडूत 10 चौकार व 7 षटकारसह नाबाद 114 धावा केल्या. यानंतर परसिसटंट संघाला 9 बाद 127 धावाच करता आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)