पुणे आय टी कप क्रिकेट स्पर्धा 2018: टेक महिंद्रा, केपीआयटी संघाचे विजय

पुणे: टेक महिंद्रा आणि केपीआयटी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकूच नोंदवली.

पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत टेक महिंद्रा संघाने इन्फोसिस संघावर तीन गडी राखून मात केली. यात इन्फोसिस संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 159 धावा केल्या. यात पंकज जिंताने 34 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 45, तर साईनाथ शिंदेने 40 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारसह 46 धावा केल्या. यानंतर टेक महिंद्राने शेवटच्या चेंडूवर विजय साध्य केला. यात सचिन गिलबिलेने अखेरच्या तीन चेंडूंत 6, 2, 4 धावा करून टेक महिंद्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या लढतीत केपीआयटी संघाने सायबेज संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. केपीआयटीच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून सायबेज संघाला 19.5 षटकांत 129 धावांत रोखले. यानंतर केपीआयटीने विजयी लक्ष्य 15.5 षटकांत 4 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक : 1) इन्फोसिस – 20 षटकांत 5 बाद 159 (साईनाथ शिंदे 46, पंकज जिंता 45, स्वप्नील थोरात 2-24, सचिन गिलबिले 1-28, हिमांशू गांधी 1-27) पराभूत वि. टेक महिंद्रा – 20 षटकांत 7 बाद 163 (सौरभ देवरे 68, स्वप्नील थोरात 30, सचिन गिलबिले नाबाद 12, सागर दुबे 3-24, रवी थापलियल 2-6).
2) सायबेज – 19.5 षटकांत सर्वबाद 129 (निखिल गिरासे 32, अफान शेख 21, मयुरेश लिखिते 2-20, निरंजन फडणविस 2-32, अंबर दंडगव्हाळ 2-19) पराभूत वि. केपीआयटी – 15.5 षटकांत 4 बाद 131 (मयुरेश लिखिते नाबाद 37, परिक्षीत किणी 44, कमलेश सुर्वे 23, निखिल गिरासे 1-24).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)