पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धा 2018: टेक महिंद्रा, कॉग्निझंट, यार्डी संघांचे विजय 

पुणे: टेक महिंद्रा, कॉग्निझंट, यार्डी सॉफ्टवेअर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना येथे सुरु असलेल्या पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत टेक महिंद्रा संघाने मास्टरकार्ड संघावर 9 गडी राखून शानदार विजय मिळवला. यावेळी टेक महिंद्राच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून मास्टरकार्डच्या संघाला अवघ्या 34 धावांत गुंडाळले. यानंतर टेक महिंद्रा संघाने विजयी लक्ष्य केवळ एक गडी गमावून पूर्ण केले. तर, दुसऱ्या लढतीत टीसीएस संघाने सनगार्ड संघावर सात गडी राखून विजय मिळवला. यानंतर सीबीएसएल संघाने अटोससिंटेल संघावर पाच गडी राखून विजय मिळवला.

अटोससिंटेल संघाने दिलेले 142 धावांचे लक्ष्य सीबीएसएल संघाने पाच गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. चौथ्या लढतीत सायबेज संघाने झेन्सर संघावर 90 धावांनी मात केली. सायबेज संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 180 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर झेन्सर संघाला 90 धावांत रोखले. पूना क्‍लबवर झालेल्या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने सिमन्स संघावर नऊ गडी राखून सहज विजय मिळवला. यात स्वप्नील घाटगेने 58 चेंडूंत 16 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 102 धावांची खेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)