पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धा: व्हेरिटास आणि सिमेन्स संघाचा विजय

पुणे: व्हेरिटास आणि सिमेन्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत व्हेरिटास संघाने आयबीएम संघावर सात गडी राखून सहज मात केली. करण राठोड (4 बळी) आणि अम्रित अलोक (3 बळी) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर व्हेरिटास संघाने आयबीएम संघाला 9 बाद 133 धावांत रोखले. यानंतर स्वानंद भागवतच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर व्हेरिटास संघाने विजयी लक्ष्य 3 गडींच्या मोबदल्यात 18.5 षटकांत पूर्ण केले. स्वानंदने 54 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारसह नाबाद 60 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यानंतर दुस-या लढतीत सिमन्स संघाने डॉइश्‍च बॅंक संघावर 85 धावांनी मात केली. सिमन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 176 धावा केल्या. यात सौरभ जळगावकरने 32 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह 52 धावा केल्या. यानंतर डॉइश्‍च बॅंक संघाला 91 धावांत गुंडाळले. हिमांशू अगरवालने डॉइश्‍च बॅंकेचा निम्मा संघ गारद केला.

संक्षिप्त धावफलक : 1) आयबीएम : 20 षटकांत 9 बाद 133 (किरण लगड 41, परिक्षत रॉय 22, करण राठोड 4-34, अम्रित अलोक 3-21) पराभूत वि. व्हेरिटास : 18.5 षटकांत 3 बाद 134 ( स्वानंद भागवत नाबाद 60, अम्रित अलोक नाबाद 34, रणवीर मानकू 16, किरण लगड 1-15, धरमवीरसिंग 1-27).
2) सिमन्स : 20 षटकांत 8 बाद 176 (सौरभ जळगावकर 52, हिमांशू अगरवाल 47, विशाल रैना 28, दीपककुमार 22, राजशेखरन सी. 2-18, तरण दीपसिंग 2-34, गौरव सचदेव 2-34) वि. वि. डॉइश्‍च बॅंक : 20 षटकांत सर्वबाद 91 (बरुण कुट्टी 38, गौरव सचदेव 15, हिमांशू अगरवाल 5-18, दीपककुमार 2-9).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)