पुणे: “आम्ही विठोबाचे यात्री, आता प्लॅस्टिकला कात्री’

आयटीयन्सची वारी, पंढरीच्या दारी : यंदा प्लॅस्टिक बंदीचा संदेश

पुणे – जगाशी “कनेक्‍ट’ असाणाऱ्या आयटी अर्थात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांनी सुरू केलेली “आयटी दिंडी’ कौतुकास्पद ठरत आहे. गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या दिंडीमध्ये हरिनामाचा गजर करत 600 ते 700 तरुण-तरुणी सहभागी होत सामजिक संदेशही देतात. यावर्षी राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाबाबत जनजागृतीपर “विठोबाचे यात्री, प्लॅस्टिकला कात्री’ हा संदेश देत वारीत सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सॉफ्टवेअर आणि आयटी फिल्डमध्ये काम करणाऱ्या काही उत्साही मंडळींनी एकत्र येऊन “आयटी दिंडी’ सुरू केलीय. सोशल मीडियाचा वापर करून या दिंडीची माहिती दिली जाते. संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे पुण्यात आगमन होण्यापूर्वी ऑनलाइन नोटिफिकेशन्स सुरू होतात. त्यात ट्रॅफिक डायव्हर्जन, कंपनीच्या बसचा बदललेला मार्ग वगैरेचीच माहिती असते. वारीतील ताल, लय, मृदुंग, टाळवादन, भजन, गायन कसे करायचे यासाठी सराव वर्ग ही भरविले जातात.

दरवर्षी वेगवेगळ्या सामजिक विषयावरील ब्रीद वाक्‍य घेउन आयटीयन्स वारीत सभागी होतात. यावर्षी प्लॅस्टिक बंदी निर्णयाचे समर्थन करणारे बोध वाक्‍य घेउन आयटीयन्स दिंडीत सहभागी होणार आहेत. आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड असा “आयटी दिंडी’चा प्रवास करणार आहे.

वारकऱ्यांमधील सहिष्णु मैत्री, एकोपा याची नवी पिढीला जाण व्हावी, यासाठी “आयटी दिंडी’ची सुरूवात झाली. या दिंडीमध्ये दरवर्षी वेगवेगळे सामजिक संदेश देत वारीत सहभागी होतो. टोप्यांवर ब्रीद लिहून संदेश समाजात दिले जातात. गेल्यावर्षी “वीर जवान संगे, हरी नाम रंगे’ असे ब्रीदवाक्‍य होते. यंदा प्लॅस्टिकबंदी बाबत जागृती केली जात आहे.
– राजेश पाटील -आयटी दिंडी संस्थापक

वारी म्हणजे गर्दी, वारी म्हणजे रस्ते बंद यापलीकडे जाऊन वारीतली सहिष्णुता, शिस्त, वारकऱ्यांचे ध्येय आणि तिथले एकूण भारलेले वातावरण तरुणांनी अनुभवावे, या उद्देशाने आयटी दिंडीची सुरूवात झाली. त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. मी विप्रो कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असून गेली 5 वर्षे दिंडीत सहभागी होत आहे. – राघवेंद्र काटीकर, सहभागी सदस्य, “आयटी दिंडी’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)