पुणे: आमदार निधीतून लष्कराला ऍम्ब्युलन्स भेट

पुणे – आमदार अनंत गाडगीळ यांच्या आमदार निधीमधून 20 लाख रुपयांची सुसज्ज, अत्याधुनिक विशेष रुग्णवाहिका लष्कराच्या हृदयरोग हॉस्पिटलला देण्यात आली. लुल्लानगरजवळील लष्कराच्या रुग्णालयाला ती देण्यात आली.

यावेळी गाडगीळ, ब्रिगेडियर वी. साहिद सय्यद, हॉस्पिटलच्या वाहन विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल ईश्वर दास, राजाभाऊ चव्हाण, माजी नगरसेवक शैलेंद्र बीडकर, प्रकाश ओसवाल, एडविन रॉबर्ट, दिलीप पवार, गोपाळ पायगुडे, पराग गोडबोले, पीटर डिसोझा, अशोक गुजर, पीटर मकवाना आदी उपस्थित होते. हृदयरोग रुग्णांसाठी या विशेष रुग्णवाहिकेमध्ये सिंगल बेड मोबाईल आयसीयु सुविधा उपलब्ध राहणार आहे. यामुळे सामान्य माणसांपासून लष्करी जवानांसाठी या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा वापर करता येणार असून, रुग्णांचे प्राण वाचतील, असे गाडगीळ म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुसज्ज्य अशी अत्याधुनिक हृदयरोग रुग्णांसाठी विशेष रुग्णवाहिकेमध्ये स्ट्रेचर, व्हिलचेअर, ट्रॉली स्ट्रेचर, इन्व्हरर्टर, ईसीजी, ऑक्‍सिजन सिलेंडर उपलब्ध राहणार आहे. रुग्णांना रुग्णवाहिकेमध्ये वैद्यकीय उपचार जागेवर देता येणार असल्याने रुग्णाचे प्राण वाचू शकतील, असे ब्रिगेडियर सय्यद यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)