पुणे – आज पाणी येणार!

महापालिका प्रशासनचा खुलासा

पुणे – धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेने दर गुरूवारी शहरात पाणी बंद ठेवण्याचे अघोषितपणे ठरविले होते. त्यास आयुक्तांनाही दुजोरा दिला असला, तरी गुरूवारी (दि. 31) पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दर गुरूवारी पाणी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवकांकडून नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाणी बंदचे मेसेज पाठविले जातात. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा खुलासा केला आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागांत वाद सुरू आहेत. त्या अंतर्गत पाणीकपात करण्याची मागणी जलसंपदा विभाग करत असला, तरी महापालिका त्यास नकार देत आहे. मात्र, गुरूवारी महावितरणकडूनच शहरातील बहुतांश भागात दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने महापालिकेस पाणी पुरवठा करणे शक्‍य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन दर गुरूवारी पाणी बंद ठेवले जाते. मात्र, या गुरूवारी कोणताही बंद ठेवण्यात आलेला नाही. मात्र, बंद असेल असा समज झाल्याने नगरसेवक, कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मेसेज पाठवून उद्या पाणी बंद राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे. मात्र, गुरूवारी पाणी नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)