पुणे : आगीच्या तीन घटना; मोठे आर्थिक नुकसान

एकाच दिवसात घडलेल्या घटनांनी अग्निशमन दलाची दमछाक

पुणे – शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी मंगळवारी आगीच्या घटना घडल्या. तीनही घटनांमध्ये जीवितहाणी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सकाळी डेक्कन येथील गुडलक चौकातील व्हिडीओकॉन डीटूएच शोरूमच्या दुसऱ्या मजल्यावर, दुपारी कसबा पेठेतील पवळे चौकात जुन्या मोकळ्या जागेत लाकडाचे साहित्य असलेल्या ठिकाणी, तर सायंकाळी शासकीय मुद्रणालयात आग लागली. पाठोपाठ घडलेल्या या घटनांनी अग्निशमन दलाची मोठी दमछाक झाली.

डेक्‍कन भागात इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्य खाक
डेक्‍कन चौक परिसरात येथे व्हिडीओकॉन डीटूएच शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास आग लागली. यात शोरुमचा दुसरा मजला जळाला. चार फायर गाड्याच्या मदतीने काही मिनिटांत नियंत्रण मिळवले. मात्र, तोवर दुसऱ्या मजल्यावरील इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्य खाक झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अधिकारी गजानन पाथ्रुडकर, वाहनचालक – शेखर येरफुल, समीर शेख, जवान-अभ्यंकर, कोंडिबा झोरे, किशोर बने, संजय पाटील, संजय गायकवाड, समीर दळवी, गणेश लोणारे, एकनाथ कुंभार, सागर शिर्के, भूषण ओव्हाळ, कुणाल वाघोले यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

कसबा पेठेतील आग आटोक्‍यात
दुसरी घटना ही कसबा पेठेतील पवळे चौकात असलेल्या जुन्या मोकळ्या वाड्यात लाकडाच्या साहित्यासआग लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन गाड्यांसह त्याठिकाणी धाव घेऊन पाऊणतासात आग आटोक्‍यात आणली. ही आग मोकळ्या जागेवर होती. मात्र, शेजारी इमारती असल्याने आगीचा धोका होता. परंतु अग्निशमन विभागाच्या तत्परतेने ही आग आटोक्‍यात आली. अग्निशमन अधीकारी रविंद्र आढाव, करडे, फायरमन बुंदीले, जगदाळे, आढारी यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले.

शासकीय मुद्रणालयातील गोदामाला आग

तिसरी घटना सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या शासकीय मुद्रणालयातील गोदामाला आग लागली. कार्यालयामागील मोकळ्या जागेत कचऱ्याचा ढिग होता. तेथे सर्वप्रथम आग लागली. यानंतर ही आग फोटोझिंको गोदमात शिरली. यामुळे फोटोझिंकोतील कागदाचे गठ्ठे जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाने तासाभरात आग आटोक्‍यात आणली. बैठ्या गोडावूनवरून पत्रे उचकटून अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्‍यात आणली. गोडावूनचे बांधकाम जुने असून तेथील लाकडी दरवाजे, साहित्यही या आगीत जळाले आहेत. ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी तांडेल राजाराम केदारी, ड्रायव्हर हनमंत कोळी, फायरमन मंगेश मिळवणे, राजेश घडशी, प्रताप फणसे, योगेश चोरगे यांनी प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)