पुणे – आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश

पुण्यात बसून अमेरिकन, ऑस्ट्रेलिया, कॅनडातील नागरिकांना करोडों गंडा

पुणे – परदेशातील नागरिकांना ऑनलाइन गंडा घालणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. खराडी भागातील एका कॉल सेंटरवर पहाटे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हार्डडिस्क, लॅपटॉप, हेडफोन, डेबिट कार्ड, मोबाइल संच तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कॉल सेंटरव्दारे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातील नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, याचा मुख्य सूत्रधार चीनमध्ये बसला असून तो फसवणुकीच्या रकमेतील 40 टक्‍के रक्‍कम स्वत: घेत असे व उरलेली 60 टक्‍के रक्‍कम भारतातील आरोपींना बीट कॉईनच्या स्वरुपात पाठवत असे. हे बीट कॉईन हवालामार्फत रोख रकमेत वर्ग करून घेतले जात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी शालीन बिपीन पंचाल, धनंजय बिपीनभाई पंचाल (दोघे, रा. दर्शन अपार्टमेंट, अहमदाबाद, गुजरात), निसर्ग सुभाष पंडीत (रा. सहारा एनक्‍लेव्ह, विमाननगर, मूळ रा. नवदुर्गा सोसायटी, पाटण, गुजरात), मितेश गोकुल ठक्‍कर (रा. हरिओम व्हिला, अहमदाबाद, गुजरात), ऐश्‍वर्य मोहन भारद्वाज (रा. साई कृष्णा अपार्टमेंट, भाईंदर) यांना अटक करण्यात आली.

खराडी-चंदननगर भागातील एका कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार केले जात असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे यांना मिळाली. त्यानंतर पहाटे प्राईड आयकॉन सोसायटीत असलेल्या सदनिकेवर छापा टाकण्यात आला. अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांची माहिती हार्डडिस्कवर साठविण्यात आली होती. पोलिसांनी या कारवाईत 25 हार्ड डिस्क, 14 लॅपटॉप तसेच आय ट्युन कार्ड जप्त केले.

प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्योतीप्रिया सिंह, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानूप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, गजानन पवार, उपनिरीक्षक सागर पानमंद, किरण औटी आदींनी ही कारवाई केली.

..अशी होती फसवणुकीची पध्दत
भारतात अहमदाबादमध्ये हे कॉल सेंटर काही वर्षे सुरू होते. दीड वर्षांपूर्वीच ते पुणे शहरात सुरू झाले. येथे पदवीधर व पदवीचे शिक्षण घेणारे मात्र इंग्रची भाषेवर प्रभृत्व असणाऱ्या तरुणांना नोकरीला ठेवण्यात आले होते. त्यांना ऐश्‍वर्य वाघमारे हा प्रशिक्षण देत होता. मात्र, येथून फसवणूक होत असल्याचे काम करणाऱ्यांना माहीत नव्हते. येथे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या काही लाख नागरिकांचा डेटा उपलब्ध होता. त्यांच्या मोबाइलवर व्हाईस मेसेज पाठविण्यात येत असे. अमेरिकेत आपल्या आधारकार्डसारखे सोशल सिक्‍युरिटी कार्ड नावाचे कार्ड आहे. त्या नागरिकांना तुमच्या कार्डव्दारे अंमली पदार्थ खरेदी केले गेल्याचे सांगितले जात असे. कार्डचा दुरुपयोग झाल्याने त्याच्या गैरवापराबद्दल सेटलमेंटसाठी पैसे भरायला लावले जायचे. याला बळी पडलेल्या नागरिकांना ऍपलच्या स्क्रीन कार्ड सारखे तेथील आय ट्यून कार्ड खरेदी करायला लावले जायचे. या कार्डचा स्क्रॅच नंबर मागितला जायचा. तो स्क्रॅच नंबर पुण्यातील कॉल सेंटरमधून चीनमधील मुख्य आरोपीला सांगितला जायचा. या नंबरव्दारे तेथील बॅंकेत आयटयून कार्डच्या खरेदीची किंमत ऑनलाइन जमा व्हायची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)