पुणे- अवैध प्रवासी वाहतूक करणारी 12 वाहने जप्त

पुणे- शहरात अवैधरित्या वाहतूकीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबई – बैंगलोर महामार्गावरील चांदणी चौक ते वारजे माळवाडी परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 12 वाहनांवर कारवाई करुन ती जप्त केली आहेत. वारजे वाहतूक शाखा तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या तपासणी मोहीमेत एकुण 40 वाहनांची तपासणी करण्यात आली. यात 12 वाहने दोषी आढळली असून ती जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये 8 टाटा मॅजिक व 4 सहा आसनी रिक्षांचा समावेश आहे. सीनजी नसलेल्या गाड्या, 20 वर्षे आयुर्मान संपलेल्या, थकीत मोटार वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र मूदतीत नसणे, विना परवाना वाहतूक करणे या कारणांमुळे या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. सदर वाहने ही वारजे वाहतूक विभाग, कोथरुड पीएमपीएमएम डेपो येथे ठेवण्यात आली आहेत. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले, विवेक गोसावी, वारजे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांसह वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली. सदर मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)