पुणे – अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत 32 हजार 835 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाचा पहिला भाग भरला आहे. 16 हजार 205 विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट असून, त्यांनी अर्ज पूर्णपणे भरावे, असे आवाहन अकरावी प्रवेश समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अकरावीसाठी प्रवेशाचा भाग पहिला व दुसरा भरावे लागणार आहे. दहावी निकाल लागण्यापूर्वी पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला भाग भरणे आवश्‍यक आहे. निकाल लागल्यांनतर प्रवेशाचा दुसरा भाग भरावे लागणार आहे.दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवड परिसर वगळता अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यानंतरच अर्ज करणे आवश्‍यक आहे. पालिका हद्दीत नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यात प्रवेशासाठी पहिला भाग निकाल लागल्यानंतर शहरातील मार्गदर्शन केंद्रावर येऊन अर्ज करावे लागेल. त्यासाठी सर्व कागदपत्रांची आवश्‍यकता आहे, असेही प्रवेश समितीकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)