पुणे : अपघातात एकाचा मृत्यू ; दोघे जखमी

पुणे – ट्रीपल सीट बुलेट चालवत बोपदेव घाटातून येवलेवाडीच्या दिशेने येत असताना रस्त्याच्या कडेला धडक बसल्याने बुलेटवरील एकाचा मृत्यू झाला; तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बुलेटचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन रुपराव गोंगे (24, रा. केशवनगर, मुंढवा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बुलेटचालक वुशांक पदमाकर होले (24, रा. केशवनगर, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर या अपघातात क्षितीज काकडे (24, रा. कर्वेनगर, कोथरुड) हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे तीघे बोपदेव घाटातून येवलेवाडीकडे येत होते. यावेळी वुशांक हा बुलेट चालवत होता तर नितीन व क्षितीज पाठीमागे बसले होते.

गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी वळणावरून खाली येत असताना मोकळ्या जागेवर धडकली. या धडकेत सर्वात शेवटी बसलेल्या नितीन याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला; तर बुलेटचालक वुशांक व मध्ये बसलेला क्षितीज हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधीक तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. देशमुख करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)