पुणे: अपघातग्रस्त वाहनचालकाला लाच मागितली

‘शेम…शेम’… दोन हजार रुपये घेणारा पोलीस रंगेहात जाळ्यात

पुणे- अपघातग्रस्त वाहनचालकाकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना ग्रामीण दलातील पोलिसाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

मल्हारी दामू राऊत (51, नेमणूक हवेली पोलीस ठाणे) कारवाई करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी ही रक्‍कम स्वीकारल्याने पोलीस दलाची मान पुन्हा एकदा शरमेने झुकली आहे.

तक्रारदाराची एक महिन्यापूर्वी दुचाकी घसरुन अपघात झाला होता. त्यावेळी तक्रारदार याने सिंहगड, डोनजे येथील हॉटेल कोहिनूर येथे गाडी लावली होती. मंगळवारी तो ही गाडी घेऊन गेला. यावेळी हॉटेल चालकाने पोलीस ठाण्यातील हवालदाराचा फोन देऊन संपर्क करण्यास सांगितले. फोनवर बोलने झाल्यावर हवालदार राऊत याने तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांनी तक्रारदाराला गाडीची कागदपत्रे आणावयास सांगितले. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना त्यांना सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास खडकवासला चौकात बालाजी वडेवाले हॉटेल येथे ताब्यात घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)