पुणे – अनफिट स्कूलबस तपासणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती

– शाळा सुरू होऊन आठवडा उलटूनही अडीच हजार वाहनांची तपासणी बाकी

पुणे – शाळा सुरू होऊन आठवड्याचा कालावधी उलटून देखील जवळपास अडीच हजार स्कूल बस वाहनचालकांकडून फिटनेस तपासणी करण्यात आलेली नाही. पूनर्फिटनेससाठी दिलेली तारीख उलटून गेली असून विनाफिटनेस धावणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विशेष तपासणी पथकांकडून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कुलबसची पूर्नफिटनेस तपासणी बंधनकारक आहे. यासाठी सुट्टीच्या कालावधीत स्कुलबसेसची तपासणी करण्याचे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले होते. यासाठी 2 व 18 जून ही तारीख देण्यात आली होती. आरटीओ कार्यालयात 4 हजार 421 स्कूलवाहनांची नोंद आहे. यातील केवळ 1 हजार 700 स्कुलबस चालकांनी पूर्नफिटनेस करून घेतले आहे. उर्वरित अडीच हजारांवर स्कुलबसचालकांनी अद्यापही वाहनांची तपासणी न केल्यामुळे या वाहनांमधून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. स्कुलबस धोरणानुसार विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी नियमावली निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीओकडून वाहनांची तपासणी करून संबंधित स्कुलबसला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. या पार्श्‍वभूमिवर अनफिट वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. स्कुलबसची फिटनेस तपासणी न करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पथकांद्वारे शहरातील विविध रस्त्यांवर धावणाऱ्या स्कुलबसची तपासणी केली जाणार असून शाळांमध्ये जाऊनदेखील स्कुलबस तपासणीला गती दिली जाणार आहे. त्यानुसार स्कुलबसची फिटनेस तपासणी झाली नसल्याचे आढळल्यास संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.
—————-
न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय स्कुलबसची पूर्नफिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. यासाठी आरटीओकडून वाहनचालकांना वेळ देऊन मोफत फिटनेस तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीदेखील बहुतांश स्कुलबस चालकांनी अद्यापही वाहनांची फिटनेस तपासणी केली नाही. त्यासाठी विशेष पथकांद्वारे वाहनांची तपासणी करून अनफिट स्कुलबसवर कारवाई करण्यात येणार आहे.
– संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)