पुणे: अनधिकृत बांधकामप्रश्‍नी 35 जणांवर गुन्हे

पीएमआरडीएची कारवाई : शहानिशा करण्याचे आवाहन

पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम पाडण्यात अडसर निर्माण केल्याप्रकरणी हडपसर व हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये एकूण 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार बांधकाम नियमितीकरणाचे कागदपत्रे हजर न केल्यामुळे संबधित अनधिकृत बांधकाम धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम सुरु असताना बांधकाम थांबविण्यासाठी वारंवार नोटीस व तोंडीसूचना बजविण्यात आल्या होत्या, तरी देखील अनधिकृत बांधकामधारकाने बांधकाम सुरूच ठेवले होते.

सदरील अनधिकृत बांधकाम कारवाई नऱ्हे, मारुंजी, मांजरी या भागात करण्यात आली आहे. ही कारवाई वास्तूविशारद, अभियंता, स्ट्रक्‍चरल अभियंता, मालक व विकसक यांच्यावर करण्यात आली आहे. सदरील गुन्हा हा अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यामध्ये पाच हजार रुपये पर्यत दंड व तीन वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते. अनधिकृत बांधकाम विभागामार्फत सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकामातील घर खरेदी करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका खोटी माहिती देऊन स्वस्त दराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांचे आर्थिक नुकसान टळावे याकरिता नागरिकांनी जागरूक राहावे. नागरिकांनी शहानिशा करूनच सदनिका खरेदी कराव्यात, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

पीएमआरडीए हद्दीतील 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी जानेवारी 2018 पासून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी 21 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत वाढून देण्यात आली होती.

कारवाईचा धडाका
मागील सहा महिन्यांत पीएमआरडीएकडून 1 लाख 5 हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले आहे. तर 22 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत बांधकाम नोंदणी केली जाऊ नये, यासाठी नोंदणी महानिरीक्षक व महावितरण कार्यालयांना आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)