पुणे : अतिक्रमणविरोधी कारवाई आता दोन ‘शिफ्ट’मध्ये

सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत चालणार बुलडोझर

पुणे- महापालिकेच्या अतिक्रमण विभागास अखेर 162 सहायक अतिक्रमण निरीक्षक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडून शहरात दोन शिफ्टमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार काळी 6 ते रात्र्री 11 वेळेत ही धडक कारवाई होणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

अतिक्रमणविरोधी कारवाई पुढील आठवड्यापासून सुरू केली आहे. महापालिकेकडून शहरात 1 जानेवारी 2018 पासून शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यांतर्गत महापालिकेने पथारी व्यावसायिकांसाठी झोन निश्‍चित केले आहेत. याव्यतिरिक्त पथारी व्यावसायिक इतर ठिकाणी आढळल्यास त्याचे साहित्य जप्त केले जाणार असून त्यांच्यावर कारवाईही केली जाणार आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रस्त्यावरील विनापरवाना हातगाड्या, स्टोल, पथारी व्यावसायिक, फिरते विक्रेते यांच्यावर कारवाई केली जाते. ही कारवाई दैनंदिन असते. प्रामुख्याने ही कारवाईची सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असते, तर काही वेळाच दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत ही कारवाईची मोहीम राबविली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने सकाळच्या वेळेत खाद्यपदार्थ रस्त्यावर विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली. मध्यवस्तीसह उपनागरांत हेच चित्र आहे. हीच अवस्था सायंकाळनंतर असते.

प्रामुख्याने खाद्यपदार्थ, भाजी, अन्य प्रकारचे साहित्य विक्रेते सायंकाळी 6 नंतर रस्त्यावर येतात आणि रात्री 11 वाजेपर्यंत अनधिकृतपणे व्यवसाय करतात. या दोन्ही वेळा प्रचंड रहदारीच्या असतात. वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे प्रशासनाने आता अतिक्रमण कारवाईची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईसाठी 15 पथके असून आणखी 15 पथके तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने 162 अतिक्रमण निरीक्षकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरतीची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर तातडीने ही कारवाई सुरू केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)