पुणे – …अखेर “पीएमआरडीए’ उभारणार पीएमपी डेपो

– वाघोलीतील चार एकर जागा ः रात्रीच्या बसेसची सोय होणार

गणेश राख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पार्किंग, डेपो तसेच रात्री बस उभारण्यासाठी पीएमपीने “पीएमआरडीए’ कडे जागेची मागणी केली होती. यावर वाघोली येथे जागा देऊन त्याचा मोबदला म्हणून 33 कोटी रुपयांची मागणी “पीएमआरडीए’ ने केली. त्यानंतर “पीएमआरडीए’ ने स्वतः वाघोली येथे डेपो उभारुन देण्याची मागणी पीएमपीने केली होती. “पीएमआरडीए’ने या मागणीला हिरवा कंदील दाखविला असून याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

पीएमपीच्या वाघोली, पाबळ, तळेगाव दाभाडे या परिसरातही अनेक बसेस रोज ये-जा करतात. मात्र, दूरच्या मार्गावर रात्री धावणाऱ्या पीएमपी बसेसना परतीच्या प्रवासात थांबण्यासाठी जागा नाही. परिणामी, या सर्व बस आगारामध्येच परततात. अनेकदा रात्री परतीच्या प्रवासात या बसेस रिकाम्याच धावतात. या पार्श्‍वभूमीवर वाघोली परिसरात डेपो उभारून संबंधित भागात धावणाऱ्या बस त्याच भागात रात्री थांबवून पुन्हा सकाळी फेऱ्या सुरू करण्यास सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे पीएमपीने प्राधिकरणाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने काही जागांचे प्रस्ताव पीएमपीला दिले होते. यापैकी वाघोली परिसरात रस्त्यालगत असलेली चार एकर जागा पीएमपीला पसंतीस पडली असून पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची पाहणीदेखील करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर येत्या तीन-चार दिवसांत वाघोलीत कशाप्रकारे काम करण्यात यावे, याबाबत आराखडा देण्यात येणार आहे.
——————-

वाघोली येथे पीएमआरडीएने बसेससाठी डेपो बांधून देण्याचे मान्य केले आहे. पीएमपीला वाघोली येथे बसेससाठी कोणत्या सुविधांची आवश्‍यकता आहे, यासंबंधी सविस्तर आराखडा पीएमआरडीएला देण्यात येणार आहे. यामध्ये वर्कशॉप, ऑफिस इमारत, कम्पाऊंड वॉल, पार्किंग व्यवस्था, सर्व्हिस रॅम्प गरजेची असून याबाबत सविस्तर माहिती पीएमआरडीएला पाठवण्यात येणार आहे.
——————–

पार्किंग, डेपो तसेच रात्री बसेस थांबवण्यासाठी वाघोली परिसरात डेपोची गरज होती. यासाठी पीएमआरडीएकडे डेपो उभारण्याची मागणी केली होती. त्या आशयाचे पत्र देखील पाठवण्यात आले होते. पीएमआरडीएने आमची ही मागणी मान्य केली आहे.
– नयना गुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालका, पीएमपी.
——————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)