पुणे: अकरावीच्या जागा नेमक्या किती ?

पहिल्याच दिवशी 8 हजार 875 विद्यार्थ्यांची नोंदणी
पहिल्याच दिवशी 8 हजार 875 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाचा अर्ज भाग दोन भरला आहे. त्यातील 356 विद्यार्थ्यांची द्विलक्षी अभ्यासक्रम घेणे पसंत केले आहे तर 6 हजार 755 विद्यार्थी यांनी कला, विज्ञान व वाणिज्य यांसारख्या शाळांची निवड केली आहे.

अकरावी जागा अद्यापही जाहीर नाही
महाविद्यालयांची नोंदणीच पूर्ण न झाल्याची भीती

पुणे – अकरावी प्रवेशासाठी बुधवारपासून अर्ज भाग दोन भरून देण्यासही विद्यार्थ्यांनी सुरुवात केली असली तरीही अद्यापही अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून यंदा अकरावीसाठी किती जागा असणार आहेत, याची माहितीच जाहीर केलेली नाही. ही माहिती जाहीर न करण्यामागे महाविद्यालयांची नोंदणीच पूर्ण झाली नसल्याचीही शंका व्यक्‍त केली जात आहे.

अकरावीचा अर्ज कसा भरावा यासाठी आज ठिकठिकाणी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. याला पालक व विद्यार्थ्यांना मोठा प्रतिसाद दिला. मात्र अर्ज कसा भरावा हे समजले तरीही अकरावी प्रवेशासाठी कोणत्या शाखेअंतर्गत किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती समितीने अद्याप दिलेली नाही. कला, वाणिज्य, विज्ञान त्याचरबरोबर द्विलक्षीसाठी किती जागा उपलब्ध आहेत, व्यावसायिक शिक्षणासाठी किती जागा आहेत. कोट्यातील जागांची संख्या किती अशा सर्व प्रकारची माहिती समितीकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याअगोदरच जाहीर केली जाते. तसेच महाविद्यालयांची संख्या किती हेही सांगितले जाते. मात्र आता दुसऱ्या फेरीतील प्रवेश सुरू झाले असले तरीही ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण न होताच समितीने प्रवेश सुरू केले असतील तर ज्या महाविद्यालयांनी अद्याप नोंदणीच केली नाही अशा महाविद्यालयांची नावेच संकेतस्थळावर दिसणार नाहीत. त्यामुळे पसंतीक्रम भरताना त्या विद्यार्थ्यांना ही महाविद्यालयेच दिसणार नाही अशीही स्थिती निर्माण होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)